मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन हनुमंत मडके यांच्या नेतृत्वाखाली मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट संस्थेने आपल्या अभिनव कार्यशैली,दृढ विश्वास आणि सदस्यनिष्ठेच्या बळावर प्रतिष्ठित ‘बँको ब्लू रिबन २०२४’ पुरस्कार पटकावला आहे. दि.३० जानेवारी २०२५ रोजी अंबेवेली सिटी येथे झालेल्या भव्य समारंभात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके यांना चंद्रकांत दळवी (माजी सहकार आयुक्त,पुणे) यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके,अकाउंट व टॅक्स विभाग प्रमुख इमरान,कर्ज विभाग प्रमुख अतुल मडके,फंड विभाग प्रमुख सूरज मडके यांची उपस्थिती होते. या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे मोहेकर मल्टीस्टेट संस्थेच्या विश्वासास अधिक बळ मिळाले असून,गुणवत्तापूर्ण सेवांचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.हा सन्मान संपूर्ण सभासद, हितचिंतक आणि कर्मचारी वर्गाचा आहे.या यशाबद्दल संस्थेच्या सर्व सभासद, हितचिंतक आणि कर्मचारी वर्गाचे मनस्वी अभिनंदन होत आहे.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन