कळंब – मराठवाडा हा इतिहास, संस्कृती आणि शिक्षण यांचा एक समृद्ध वारसा असलेला भाग आहे.परंतु,एकेकाळी हा प्रदेश शिक्षणाच्या दृष्टीने मागासलेला होता.या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले,अशा महान शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी शिक्षणाचा दीप मराठवाड्यात प्रज्वलित करण्याचा ध्यास घेतला.त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक शाळा, विद्यालये आणि वसतिगृहे स्थापन केली.त्यांचे हे कार्य केवळ शिक्षणप्रसारापुरते मर्यादित नव्हते,तर त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीही प्रयत्न केले. १९५१ साली निजामशाहीच्या काळात मराठवाड्यात शिक्षणाची परिस्थिती अत्यंत कठीण होती.सामाजिक विषमता,आर्थिक दुर्बलता आणि तत्कालीन राजकीय स्थितीमुळे शिक्षण घेणे हे मराठवाड्यातील सामान्य नागरिकांसाठी स्वप्नवत होते.अशा कठीण परिस्थितीतही ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने शिक्षण प्रसाराचे कार्य अविरत सुरू ठेवले. मोहेकर गुरुजींचे उद्दिष्ट केवळ शिक्षण देणे नव्हते,तर मानवी जीवनमान उंचावून समाजात ताठ मानेने जगता यावे,यासाठी ते शिक्षणाला समाजसुधारणेचे प्रभावी साधन मानत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील गरीब,दलित, मागासवर्गीय आणि कष्टकरी लोकांना शिक्षणाची संधी मिळाली.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलले आणि ते समाजात आदर्श नागरिक बनले. आज ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी उभारलेल्या संस्था मराठवाड्यातील शिक्षणाचा कणा बनल्या आहेत.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली.त्यांनी सर्वसमावेशक शिक्षणाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले आणि शिक्षणाला केवळ ज्ञानार्जनाचे साधन न ठेवता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून विकसित केले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी आपले संपूर्ण जीवन शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केले.त्यांनी मराठवाड्यात शिक्षणक्रांती घडवून आणली आणि समाजाच्या विकासाला नवा दिशा दिली.त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे आणि भविष्यातही प्रेरणा देत राहील.
ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मराठवाड्यातील विविध ठिकाणी विविध शाळा,महाविद्यालयात गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कळंब तालुक्यातील मोहा या गुरुजींच्या मूळगावी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक ३० जानेवारी २०२५ वार गुरुवार रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर,प्रा.दिग्विजय पाटील,प्रा.नवनाथ करंजकर,प्रा.अशोक राऊत व सा.साक्षी पावनज्योत कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूल मध्ये कार्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,सा.साक्षी पावनज्योत प्रतिनिधी संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी ता.कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुनिल पांचाळ व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथील कार्यालयात शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षक व्ही. एन.मोरे,सहाय्यक शिक्षिका सुवर्णा मुंडे,दत्तात्रय वळेकर आदींची उपस्थिती होती.
जयभवानी विद्यालय पारा येथे प्रशालेमध्ये शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एन.बी.सुर्यवंशी,सहाय्यक शिक्षक भराटे एस डी,मेटे एस व्ही,वाघमारे एस झेड, मुरकुटे डी व्ही, माळी व्ही एस,बांगर ए बी,मुळे डी एस, सोलंकर एस बी,अमोल गवळी, तुषार डंबरे व सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विद्याभवन हायस्कुल,कळंब येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक व्यकंट कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका जगदेवी कोळी सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे