कळंब (धनंजय घोगरे) – कळंब तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.छायाताई संजय बोंदर यांच्यावतीने मौजे देवधानोरा येथे भव्य महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला व अल्पउपहाराची सोय करण्यात आली होती. अधिक वृत्त असे की,कळंब तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.छायाताई संजय बोंदर यांच्या वतीने मौजे देवधानोरा येथे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी विविध लुटण्याचे साहित्य महिलांना वाटप करण्यात आले तसेच अल्पउपहारही देण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी अध्यक्षा छायाताई संजय बोंदर यांचे आभार मानले व त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन