मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथे दि.३० जानेवारी २०२४ रोजी ज्ञान प्रसार प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षणासोबतच मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळावे,विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळावे , विद्यार्थ्यांना व्यवसायाची मांडणी, हिशोब,मार्केटिंग,संवाद कौशल्य,इ.कौशल्य विकसित व्हावेत यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश ( भाऊ ) मोहेकर तर प्रमुख पाहुणे शालेय शिक्षण समितीचे सदस्य गौतम मडके,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य जगताप संजय,सामाजिक कार्यकर्ते अशोक मडके,प्रशालेचे पर्यवेक्षक मडके धनंजय आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांनी केले तर प्रमुख पाहुणे अशोक मडके यांनी “शिक्षणासोबतच व्यवसायाची मांडणी,मार्केटिंग,संवाद कौशल्य,या गोष्टी विद्यार्थ्यांच्या विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.यावेळी विविध खाद्य पदार्थ,भाजीपाला,चहा, शेतातील रानमेवा आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लावले होते त्यातून त्यांना ‘खरी कमाई ‘ लक्षात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर शेवाळे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन सतीश मडके यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहाचे पर्यवेक्षक कमलाकर शेवाळे,गुंगे सूर्यकांत ,प्रा.रोहित मोहेकर,सतीश मडके,प्रा.दिग्विजय पाटील,संजय मडके,श्रीमती पांचाळ उषा श्रीमती,चिलवंत राजाभाऊ,राऊत अशोक,शिंदे डी.एन.जाधव पांडूरंग,अंगद आगलावे,प्रथमेश साडेकर आदींनी प्रयत्न केले.तर या कार्यक्रमास मोहा नगरीतील पालक वर्ग,ग्रामस्थ,विद्यार्थी,विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा भरपूर आणि आनंदाने आस्वाद घेतला.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न