कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंबचे माजी उपप्राचार्य,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे व्हॉईस चेअरमन डॉ.डि.एस.जाधव यांना परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्यावतीने दिला जाणारा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यांचे दैनिक एकमत या वर्तमानपत्रांमध्ये रविवार सप्तरंगी पुरवणीमध्ये वनौषधी सदर यात ४९० वनौषधी लेख प्रकाशित झालेले आहेत. वनस्पती शास्त्रामध्ये दोन संशोधन पेपर प्रकाशित आहेत. वेगवेगळ्या विषयावरती सहा पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. विविध जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये निरीक्षक म्हणून कार्य पाहिले आहे.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल आहे.त्याबद्दल त्यांची सदरील पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्राद्वारे परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गचे सचिव मारुती बनसोडे यांनी कळवले आहे.सदरील पुरस्कार वितरण २ फेब्रुवारी २०२५ रोजी आपलं घर नळदुर्ग या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले