कळंब – कळंब शहरातील दत्तनगर भागात अनिल चोंदे व त्यांच्या घरासमोरील घरावर अनेक दिवसापासून दिवसा,रात्री -मध्यरात्री अचानक दगड नियमितपणे पडायचे.यामुळे हा काहीतरी भानामतीचा प्रकार असावा या संशयाने अख्खी गल्ली घाबरून गेलेली होती. महिला तर खूपच भयभीत झाल्या होत्या.चोंदे यांच्या घरातील फ्रीज वर दगड येवून पडला.त्यामुळे फ्रीजला खोच पाडली.दगड कोण टाकते,का टाकते,कोठून येतात हे काहीच उमगत नाही.अशावेळी कळंब अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे हा विषय आला.दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष,माधव बावगे, विवेक वाहिनी विभागाच्या राज्य कार्यवाह प्राचार्य डॉ.सविता शेट्ये,जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे व शाखा पदाधिकारी या ठिकाणी पोहोचले व त्यांनी करणी भानामती बाबतची भूमिका सांगितली.करणी भानामती शोधण्याचे एक तंत्र महा.अंनिसने बोक्षित केलेले आहे.या प्रकारचा आम्ही निश्चित शोध घेवू.शोध मोहिमेत सापडलेल्या व्यक्तीच्यावत पुढे काय कार्यवाही होते हे जादूटोणा विरोधी कायद्याचे काय परिणाम भोगावे लागतील. हे सांगून कुठली कॉफी विस्तव नसताना आग कशी लागू शकते, वळणीवरचे कपडे कसे जळू शकतात,आपोआप दगड पडूच शकत नाहीत.ते ते कोणत्या तरी हतानीच पडतात.ते आम्ही शोधूच असे सांगून काही प्रयोग करून दाखवले.उद्या प्रजास्त्तक दीन असल्याने आज याचा शोध घेणार नाही खरे तर येवढ्यावरच हे थांबेल.नाही थांबले तर एका दिवशी येवून याचा शोध घेणारच असे सांगितले.अशी काही शक्कल वापरली आणि घरावर व गल्लीत दगड पडणे हा प्रकार २८ तारखेला रात्रीपर्यंत एक ही दगड पडला नाही.हा प्रकार पूर्णतः बंद झाला.
🔵 अशी वापरली शक्कल – चोंदे यांच्या घरावर पडणारे हे दगड हँड ग्लोज घालून एकत्रीत करून पोलिसात देणार असल्याचे कळताच अचानक दगड पडणे बंद झाले.
🔵 भोंदू बाबा ने दिला होता बोकड कापण्याचा सल्ला – अनेक प्रयत्न करून देखील हे दगड कोठून येतात याचा शोध लागत नव्हता.अशा वेळी अनिल चोंदे यांनी एका भोंदूबाबाकडे धाव घेतली.त्यावेळी या भोंदूबाबाने हा भानामतीचा प्रकार असल्याचे सांगून येथील तहसीलदार बाबाला बोकड कापण्याचा सल्ला दिला होता. आपल्या परिसरात असे काही भानामती अथवा चमत्काराचे प्रकार घडत असतील तर तात्काळ अंनिस च्या कार्यकर्त्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आणि या नगरातील लोकांनी भीतीचा निस्वास सोडला.
हा प्रकार थांबल्याने लोकांनी महा.अंनिसचे माधव बावगे, प्राचार्य डॉ.सविता शेटे,अरविंद शिंदे आणि सर्व टीम चे मनापासून आभार मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले