धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 30 ऑक्टोबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 51 कारवाया करुन 51,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
कळंब पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)अजित बंडु कोल्हे, वय 23 वर्षे, रा. भाटसांगवी, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.30.10.2023 रोजी 11.05 वा. सु.हॉटेल तुळजाभवानी समोर कळंब शिवार येथे अंदाजे 280 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 4 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर 2)महादेव प्रभु काळे, वय 43 वर्षे, रा.इंदीरानगर, कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.30.10.2023 रोजी 12.55 वा. सु. आपल्या राहात्या घराचे पत्रयाचे शेड समोर अंदाजे 1,140 ₹ किंमतीची 19 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 3)सुशीला आरुण पवार, वय 31 वर्षे, रा. कल्पनानगर, पारधीपीडी कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि.30.10.2023 रोजी 12.30 वा. सु. समतानगर पु. सावरगाव येथे अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.30.10.2023 रोजी 09.55 वा. सु. कळंब पो. ठा. हद्दीत मराठा हॉटेलचे शेजारी कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सलीम ईब्राहीम बागवान, वय 30 वर्षे, रा. गांधी नगर, कळंब, ता.कळंब जि. धाराशिव हे मराठा हॉटेलचे शेजारी कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 820 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.30.10.2023 रोजी 12.30 वा. सु. भुम पो. ठा. हद्दीत बसस्थानक भुम चे मागील बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)समाधान भारत कदम, वय 32 वर्षे, रा. शेंडगे गल्ली, भुम ता. भुम ता. जि. धाराशिव हे बसस्थानक भुम चे मागील बाजूस सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 470 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)औदुंबर वसंत सावंत, वय 32 वर्षे, रा. कसबा गल्ली, भुम ता. भुम ता. जि. धाराशिव हे बसस्थानक भुम चे समोरील बाजूस सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 630 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.30.10.2023 रोजी 13.00 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा. हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ सांजा रोडलगत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)इम्रान आमीन शेख, वय 37 वर्षे, रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव ता. जि. धाराशिव हे छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ सांजा रोडलगत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 590 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.30.10.2023 रोजी 14.10 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत केशेगाव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रामेश्वर रोहीदास सपाटे, वय 32 वर्षे, रा. केशेगाव ता. जि. धाराशिव हे केशेगाव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 410 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.30.10.2023 रोजी 19.50 वा. सु. येरमाळा पो. ठा. हद्दीत येडेश्वरी मंदीर कमानी समोर पत्रयाचे शेडसमोर येरमाळा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सुबोध तात्या ओव्हाळ, वय 35 वर्षे, रा. भिमनगर, येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे येडेश्वरी मंदीर कमानी समोर पत्रयाचे शेडसमोर येरमाळा येथे मुंबई मेन बाजार मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 930 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हे दाखल.” परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- सुनिल निवृत्ती माने, वय 41 वर्षे, व्यवसाय- बस चालक, करमाळा आगार, रा. साडे, ता. करमाळा जि. सोलापूर हे करमाळा येथील बस क्र एमएच 14 बीटी 2153 ही बार्शीकडे घेवून जात असताना दि.30.10.2023 रोजी 12.15 वा. सु. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा येथे मराठा आरक्षणाचे अनुशंगाने निघालेल्या मोर्चातील एका अज्ञात व्यक्तीने बसचे समोरील काचेवर दगड मारुन बसचे काच फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुनिल माने यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हे दाखल.”
ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) तेजस दशरथ नाईकवाडी, 2) अविनाश बिभीषन आगाशे रा. तेर ता. जि. धाराशिव यांनी दि. 29.10.2023 रोजी 11.30 वा. सु. तेर येथे वास्तुसंग्रहालय जवळ रोड येथे फिर्यादी नामे- ओम राम कदम, वय 21 वर्षे, रा. तेर, ता. जि. धाराशिव यांना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन नमुद अरोपींनी त्यांचे मोटरसायकल ही हयगयीने व निष्काळजीपणे फिर्यादीचे मोटरसायकलला जोराची धडक देवून फरुफटत नेले त्यामुळे फिर्यादी यांचे जिवाला धोका होवून मोटरसायकलचे नुकसान केले व शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ओम कदम यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 308, 279, 427, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- गणेश शेषेराव जगताप, वय 36 वर्षे, व्यवसाय- बस चालक, निलंगा आगार, रा. बेडगा, ता. निलंगा जि. लातुर हे पुणे ते निलंगा जाणारी बस क्र एमएच 20 बीएल 1941 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 16.30 वा. सु. कोल्हेगाव येथुन जात असताना आरोपी नामे- 1)सचिन बापुराव लंगडे, 2) अविनाश माणिक लगंडे, दोघे रा. ढोकी, ता. जि. धाराशिव 3) आकाश सुधाकर टेकाळे, कोल्हेगाव ता. जि. धाराशिव, 4) नितीन मधुकर शेळके रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देवून दगड हातात घेवून बसवर मारत असताना फिर्यादी हे म्हणाले की दगड मारु नका असे म्हणत असताना नमुद आरोपींनी तु गप्प बस अशी दमदाटी करुन बस चालवण्यास अटकाव केला व प्रवाशांच्या व फिर्यादीचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन बसवर दगडफेक करुन समोरील काचेवर दगड मारुन बसचे समोरील काच, हेडलाईट व वायफर फोडून 15,000 ₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश जगताप यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 427, 308, 186 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- कृष्णा दत्तात्रय काळे, वय 26 वर्षे, रा. वासुदेव गलृली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची टिव्हिएस स्कुटी क्र एमएच 25 एवाय 2493 ही दि.27.10.2023 रोजी 23.00 ते दि. 28.10.2023 रोजी 02.00 वा. सु. हॉटेल श्रेयस कामत तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कृष्णा काळे यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अशोक नरहरिराव सोडगीर, वय 52 वर्षे, व्यवसाय नोकरी बारामती फाटा(एचएसपी) जिल्हा पुणे ग्रामीण हे व सोबत त्यांची पत्नी असे लातुर येथे जाण्यासाठी तुळजापूर बसस्थानक येथे गेले असता फिर्यादी हे खाजगी वाहन बघण्यासाठी बाहेर गेले असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे पत्नीस तुमचे पैसे पडलेत असे म्हणून त्यांचे समोरील बॅग ज्यामध्ये रोख रक्कम 3,000 ₹, पावर बँक, खाकी वर्दी, बेल्ट, कॅप, दोन साधे ड्रेस, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अशोक सोडगीर यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-साहेबलाल बशीर शेख, वय 53 वर्षे, रा. रामलिंगनगर येडशी ता. जि. धाराशिव हे दि.26.10.2023 रोजी 12.50 वा. सु. स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा येडशी येथे 33,000₹ पैसे भरण्यासाठी गेले असता अज्ञात दोन व्यक्तीने साहेबलाल शेख यांना बोलन्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांचे 14,500₹ काढून घेवून निघून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- साहेबलाल शेख यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)भाउ उध्दव राठोड, 2) गोरख उध्दव राठोड, 3) कमल गोरख राठोड, 4) ललीता भाउ राठोड, 5) देवीचंद उध्दव राठोड, 6) सुमन देवीचंद राठोड, 7) नितीन देविचंद राठोड सर्व रा. कावलदरा ता. जि. धाराशिव यांनी दि.30.10.2023 रोजी 09.00 वा. सु. कावलदरा शिवारतील शेत गट नं 187 मध्ये फिर्यादी नामे- ललीता राजेंद्र राठोड, वय 45 वर्षे, रा. कावलदरा, ह.मु. अपसिंगा रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव या नमुद आरोपींना म्हणाल्या की आमचे शेतातील सोयाबीनचे पिक का काढत आहात असे विचारत असताना नमुद आरोपींनी फिर्यादीस व त्यांचा मुलगा आकाश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ललीता राठोड यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 143, 147, 148, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)हनुमंत भारत यादव, 2) आण्णासाहेब भारत यादव, 3) भारत शेकु यादव सर्व रा. आंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांनी दि. 29.10.2023 रोजी अंबेजवळगा शिवारात शेत गट नं 155 मध्ये फिर्यादी नामे- ज्योतीबा सुभाष यादव, वय 38 वर्षे, रा. आंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांना शेत रस्त्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने फिर्यादीचे उजवे हाताचे मनगटावर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ज्योतीबा यादव यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)रंजीत हनुमंत भैरट रा. शेलगाव, 2) महादेव कोंडीबा जाधव, 3) अनिल जगन्नाथ खोसे, 4) नितीन मुरलीधर तळेकर, 5) नितीन विजय तळेकर, 6) विजय देवकराव तळेकर, 7) विनोद रामदास खोसे, 8) मधुकर पन्नुलाल क्षत्रीय, 9) निखील हरीश्चंद्र भैरट, 10) संदेश महादेव जाधव, 11) अविनाश ज्ञानोबा मेटे, 12) नामानंद बाजीराव मेटे, 13) सचिन हनुमंत खोसे, 14) अमोल हनुमंत खोसे, 15) राजाभाउ विश्वनाथ सावंत, 16)अमर रामभाउ खोसे, 17) प्रमोद तुकाराम पाटील, 18) राजाभाउ साहेबराव खोसे, 19) दत्ता कल्याण मेटे, 20) अक्षय सदाशिव गवळी, 21) प्रल्हाद आण्णासाहेब मेटे, 22) शिवाजी वैजीनाथ मुळीक, 23) रोहन आप्पासाहेब सावंत व इतर अनोळखी 50 ते 60 इसम यांनी दि. 30.10.2023 रोजी 10.00 ते 14.00 वा. सु. विजोरा पाटी येथे एनएच 52 नॅश्नल हायवेवर मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 नुसार लागु केलेल्या जमावबंदी व शस्त्रबंदी ओदशाचे उल्लघंन करुन बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावर येणारे जाणारे वाहने पुर्वसुचना न देता अडवून वाहनासमोर लोकांचे जिवीतास धोका उत्पन्न होईल अशा रितीने टायर व लाकडी ओंडके जाळून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी- दादाराव शिवाजी औसरे, वय 31 वर्षे, पोलीस अंमलदार/144 नेमणुक- पोलीस ठाणे वाशी यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 341,188, 283, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
व इतर अनोळखी 50 ते 60 इसम यांनी दि. 30.10.2023 रोजी 10.00 ते 14.00 वा. सु. सरमकुंडी पाटी येथे एनएच 52 नॅश्नल हायवेवर मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 नुसार लागु केलेल्या जमावबंदी व शस्त्रबंदी ओदशाचे उल्लघंन करुन बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावर येणारे जाणारे वाहने पुर्वसुचना न देता अडवून वाहनासमोर लोकांचे जिवीतास धोका उत्पन्न होईल अशा रितीने टायर व लाकडी ओंडके जाळून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी- रणजित अनिल कासारे, वय 31 वर्षे, पोलीस अंमलदार/1514 नेमणुक- पोलीस ठाणे वाशी यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 341, 188, 283, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी