August 9, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांना विविध ठिकाणी अभिवादन

  • कळंब – मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात मौलिक योगदान देणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना दि.२३ जानेवारी २०२५,वार गुरुवार रोजी विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
    निजामकालीन सन १९५१ मध्ये, कोणत्याही दळणवळण साधनांशिवाय ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी “संत नामदेवाचे ज्ञान दीप लावू जगी” या बोधवाक्याखाली ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांची स्थापना केली.त्यांच्या अथक परिश्रमातून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला.
    त्याग,तपस्वी आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेला विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांच्या कार्याने शिक्षण क्षेत्राला दिलेला उजाळा अमूल्य असून,ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
  • कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात गुरुजींच्या पुतळ्यास प्रा.राघवेंद्र ताटीपामुल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनिल मडके,उपप्राचार्य तथा सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरूजींना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, प्रा.सुनील साबळे,राहुल भिसे, नवनाथ करंजकर,देवदत्त मोहेकर,शैलेश गुरव,अशोक राऊत आदी जण उपस्थित होते.
  • भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींनी अभिवादन केले.
  • विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी ता.कळंब येथे कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी हायस्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
  • दिनांक २३ जानेवारी २०२५ वार गुरुवार रोजी संभाजी विद्यालय पिंपळगाव (लिंगी) ता.वाशी येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेत करण्यात आले. त्यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

  • ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे दि.२३ जानेवारी २०२५ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी ( आण्णा ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,श्रीमती पांचाळ उषा ,श्रीमती सोनवने निता ,श्रीमती स्मिता पाटील,जाधव व्ही.पी आदींची उपस्थिती होती.

 

error: Content is protected !!