कळंब ( राजेंद्र बारगुले ) – आजच्या पिढीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाचा सकारात्मक उपयोग करण्यासाठी प्रयत्न करावा,असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवेच्या प्रकल्प अधिकारी ताई बोराडे यांनी केले. धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.३ जाने २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व बालिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रा.मोहिनी शिंदे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बालविकास सेवेच्या प्रकल्प अधिकारी ताई बोराडे,पर्यवेक्षिका अनिता थोरात,दिक्षा गायकवाड ह्या होत्या. ताई बोराडे पुढे म्हणाल्या की, “दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः किती सकारात्मक गोष्टी करत आहोत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण ही केवळ प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया नसून समाजाच्या उन्नतीसाठी व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी महत्त्वाचे साधन आहे.” पर्यवेक्षिका अनिता थोरात यांनी उपस्थित युवकांना शिक्षणाचा समाजहितासाठी उपयोग करण्याचा सल्ला दिला आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका नेहा सिरसट व साक्षी वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका प्रांजली शिंदे तर आभार छात्राध्यापिका स्नेहल खोडसे यांनी मानले. या कार्यक्रमात अध्यापक विद्यालयाच्या छात्राध्यापिका संजीवनी देवकर,प्रिती महादवार,साक्षी कवडे,माहिन शेख व रोहित शिंदे यांनी इंग्रजी,हिंदी व मराठी भाषेतून आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान सांगितले. याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित संभाजी विद्यालय,पिंपळगाव( लिंगी ) चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमंत कोठावळे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,विनोद कसबे सह सर्व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन