August 8, 2025

कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकावला दूसरा क्रमांक

  • कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच शिरढोण येथे झालेल्या तालुका तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दुसरा क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले.अनेक शाळांशी स्पर्धा करताना,कॅनव्हासच्या विद्यार्थ्यांनी “नैसर्गिक शेती” या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाला नावीन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे विशेष कौतुक मिळाले.
    या प्रकल्पात आधुनिक व पर्यावरणपूरक शेती तंत्रांचा समावेश होता,ज्यामध्ये हायड्रोपोनिक शेती,व्हर्टिकल फार्मिंग,रेनवॉटर हार्वेस्टिंग, शेणखताचा उपयोग आणि सौर ऊर्जा वापरून शेती यांचा उल्लेख होता.
    विद्यार्थ्यांनी या तंत्रांची सखोल संशोधन व सर्जनशील सादरीकरणातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपाय सादर केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे परीक्षकांची शाब्बासकी आणि शाश्वत शेतीच्या प्रक्रियेतील योगदानासाठी भरभरून प्रशंसा मिळाली.
    शाळेचे विज्ञान शिक्षक अमोल सांजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कु.धनश्री पवार हिने हा प्रकल्प विकसित केला.त्यांनी आधुनिक शेतीचे आव्हाने ओळखून पर्यावरण स्नेही उपाय शोधले. त्यांच्या सादरीकरणात सखोल ज्ञान,नावीन्यपूर्ण उपाय आणि आजच्या शेतीच्या गरजांसाठी लागणारे मुद्दे प्रभावीपणे मांडले.
    यावेळी आर.व्ही.चकोर (गटविकास अधिकारी वर्ग-1), डी.एम.काळमाते (गट शिक्षणाधीकरी),एस.एस.माळी ( विभाग प्रमुख तथा विस्तार अधिकारी (शिक्षण), पंचायत समिती,कळंब यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले.
    कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे संस्थापक रवि नरहिरे यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले,”ही कामगिरी आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या समर्पण, नावीन्यता,आणि एकत्रित प्रयत्नांचे द्योतक आहे.त्यांच्या यशामुळे आम्हाला वर्गाच्या बाहेर विचार करण्याची प्रेरणा मिळते आणि खऱ्या जगाच्या आव्हानांना उत्तर देण्याची क्षमता निर्माण होते.”
    संपूर्ण कॅनव्हास कुटुंब या उल्लेखनीय यशाचा आनंद साजरा करत आहे आणि विद्यार्थ्यांच्या कष्ट व यशाबद्दल अभिनंदन करत आहे.ही कामगिरी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी असून, इतरांना विज्ञान व शाश्वततेच्या नाविन्यपूर्ण वाटांवर विचार करण्यासाठी प्रोत्साहन देते.
error: Content is protected !!