कळंब – कु.आरती किशोर बियाणी कळंब या विद्यार्थिनीने आपल्या यशाचा आलेख सतत उंच राखला असून तीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे येथून बी.फार्मसी मध्ये सहावी व जे एस पी एम महाविद्यालय पुणे विशेष प्रविण्यासहित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिचे माध्यमिक शिक्षण कळंब येथील विद्याभवन हायस्कूल मध्ये झाले असून माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा 2017 ( इयत्ता दहावी ) 97.40 % गुण घेऊन शाळेतून पहिली येण्याचा मान मिळवला होता.आरतीचे वडील किशोर बियाणी हे उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखा कळंब साठी संक्षेप ठेव प्रतिनिधी काम करतात या यशाबद्दल आरतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले