कळंब (माधवसिंग राजपूत) – 91 वी महाराष्ट्र राज्य कुमार / कुमारी वयोगट ( 20 ) वर्षाच्या आतील अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेस सांगली येथे सुरुवात झाली असून यासाठी धाराशिव जिल्हा संघासाठी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने दहा दिवसाचे प्रशिक्षण शिबिर क्रीडा संकुल कळंब येथे घेण्यात आले. या स्पर्धेसाठी शिराढोण येथे जिल्हा चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यामध्ये 18 मुलींची निवड करण्यात आली होती. यापैकी कळंब येथील या शिबिरातून 12 मुलींची संघासाठी,धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांच्या मार्गदर्शनात सराव,प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात आले.दिनांक 26 डिसेंबर रोजी या शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी उद्योजक विठ्ठलराव माने,धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते,उपाध्यक्ष फुलचंद कदम,राष्ट्रीय पंच सुबराव कांबळे,राष्ट्रीय पंच रमेश मोहिते, प्राचार्य जगदीश गवळी, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, वक्ते महादेव खराटे,माधवसिंग राजपूत,निलेश माळी तसेच टीम मॅनेजर अशोक आसबे,स्वाती शिरसट यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात लक्ष्मण तात्या मोहिते यांनी मुलीच्या संघासाठी प्रशिक्षण शिबिर घेतले व मार्गदर्शन केले याचा फायदा संघास होणार असून,संघास यश मिळणार आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या.शिबिरार्थी मुलींसाठी कळंब येथील उद्योजक विठ्ठलराव माने यांनी दहा दिवस भोजन व्यवस्था केली व संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था कळंबच्या वतीने कै.मंगेश खोसे यांच्या स्मरणार्थ प्रशिक्षणार्थी मुलींना ड्रेस किट देण्यात आले आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेश खोसे,उपाध्यक्ष ओंकार काळे, सदस्य रमेश मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे यांनी केले तर आभार संघनायक निकिता जावळे हिने मानले.सांगली येथे स्पर्धेसाठी रवाना झालेला मुलीचा संघ पुढीलप्रमाणे अपूर्वा भराटे,अमृता कुरुंद,श्रावणी कुरुंद,संध्या राठोड,साक्षी मिसाळ ,साक्षी संतोष भराटे, साक्षी पोपट भराटे,अनुजा पवार, वैष्णवी बाबर ,तेजश्री वाघमारे,निकीता जावळे,अपेक्षा जावळे यांचा समावेश आहे.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे