कळंब (राजेंद्र बारगुले ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत शहरातील भैरवनाथ आयटीआयने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात “डिश टीव्ही सॅटॅलाइट फाईंडर” प्रोजेक्ट सादर करून उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. या प्रोजेक्टच्या यशामुळे विभागस्तरीय स्पर्धेत भैरवनाथ आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांना बनविलेले आपले मॉडेल सादर करून विभागीय स्तरांवर कामगिरी दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींचे नाविन्यपूर्ण विचार आणि तांत्रिक कौशल्यांना मान्यता मिळाली आहे. भैरवनाथ आयटीआय ने बनविलेल्या “डिश टीव्ही सॅटॅलाइट फाईंडर”प्रोजेक्टचा उद्देश डिश टीव्ही सिग्नल्सच्या अचूकतेची मोजमाप करण्यासाठी आणि उपग्रह सिग्नल शोधण्यासाठी एक डिजिटल साधन तयार करणे हा होता. या प्रकल्पामुळे डिश एंटीना अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे स्थापित करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. या प्रकल्पामध्ये खालील प्रशिक्षणार्थ्यांना सामील होते आंबिरकर प्रथमेश,डोईफोडे संस्कार,चाटे कृष्णा,काळे ज्ञानेश्वर,आदर्श माळी ह्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेने आणि तांत्रिक कौशल्यांनी या प्रकल्पाला आकार दिला आणि त्याला यशस्वी बनवले. “डिश टीव्ही सॅटॅलाइट फाईंडर” प्रोजेक्टला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्यामुळे, संस्थेने तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले आहे. या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,भैरवनाथ औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद जाधव,सोनाली धमाले व वेद शैक्षणिक संकुलातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला