February 9, 2026

धाराशिव जिल्हा परिषद शाळा मधील १३५०० विद्यार्थ्यानी दिली शिष्यवृत्ती सराव परीक्षा

  • कळंब – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांची गुणवता वाढवणे साठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम मिशन शिष्यवृती या उपक्रमा अंतर्गत इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन मंगळवार (ता.२४) जिल्हयात ८० केंद्रावर करण्यात आले होते.
    शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी व स्पर्धा परीक्षांचा अनुभव जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या १०० टक्के विद्यार्थ्यांना मिळावा,या उदात्त हेतूने या सराव परीक्षेचे आयोजन करण्यांत आलेले होते.
    शिष्यवृतीच्या मुख्य परीक्षे प्रमाणेच उत्तरपत्रिका साठी OMR शीटचा वापर केला गेला. जिल्हास्तरावरून तसेच गटस्तरावरूनही वरीष्ठ अधिकाऱ्यांना या सराव परीक्षेला भेटी दिल्या.मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.मैनाक घोष व शिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील यांनी तुळजापूर व गोविंदपूर या परीक्षा केंद्राना भेटी दिल्या.या सराव परीक्षेचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषद स्वनिधी मधून केला जात आहे.
    या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची गुणवता वाढीस निश्चीत मदत मिळणार आहे मुख्य परीक्षेपूर्वी दि.२१ जानेवारी २०२५ रोजी याच प्रकारच्या द्वितीय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.तसेच या दोन्ही सराव परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या १० विद्यार्थ्याची जिल्हास्तरावरही सराव परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले.परीक्षा सुरळीत पार पडल्यावर मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
error: Content is protected !!