February 9, 2026

लोमटे विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी

  • भाटशिरपुरा – भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुरा येथे भारत मातेचे थोर सुपुत्र पूज्य साने गुरुजी यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली.
    यावेळी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पूज्य साने गुरुजी यांनी केलेल्या कार्याची माहिती सहशिक्षक एस.जी.सूर्यवंशी व एच.ए.पानढवळे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते तर प्रमुख उपस्थितीत एस.एस. डिकले,बी.व्ही.ओव्हाळ हे होते. तसेच यावेळी २४ डिसेंबर ग्राहक दिन साजरा करण्यात आला व ग्राहक दिनाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. ग्राहक चळवळ कायदा तयार करण्यात यावा म्हणून बिंदू माधव जोशी यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्याविषयी माहिती देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी विनायक शिंदे व विनोद साळवे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक एस.जी.सूर्यवंशी यांनी मानले.
error: Content is protected !!