August 8, 2025

महाविहार येथे सातवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

  • लातूर – बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्या वतीने पु.भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली,पु.भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी महाविहार धम्म संस्कार केंद्र,सातकर्णी नगर, रामेगाव,लातूर येथे ७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक भिक्खु पय्यानंद थेरो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
    बुधवार रोजी संपन्न होणाऱ्या सातव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभा मंडपाचे रोपण माजी नगरध्यक्ष लक्ष्मण कांबळे,साहेबराव नरवाडे,पोलीस निरीक्षक,गांधी चौक लातूर यांच्या हस्ते तर प्रा.बापू गायकवाड,डी.एस.नरसिंगे,
    प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे, बसवंतप्पा उबाळे,प्रा.यु.डी. गायकवाड,पांडुरंग अंबुलगेकर, विश्वनाथ आल्टे,सुशील चिकटे, आंनद सोनवणे,भीमराव चौदंते, ज्योतीराम लामतुरे,मिलिंद धावारे,उदय सोनवणे,परमेश्वर आदमाने,प्रमोद देठे,सतिश मस्के इत्यादीच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.दि २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळच्या प्रथम सत्रात सकाळी ठीक ०८:०० वाजता डॉ.आंबेडकर चौक बौध्द नगर येथे धम्मध्वजारोहण करून बुध्द मुर्ती सहित भिक्खु संघ उपासक उपासिका यांची लातूर शहरातून भव्य मिरवणूकीस प्रारंभ होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे समापन होणार आहे.दुसऱ्या सत्रात दुपारी ठीक १२:०० वाजता सातव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उदघाटन श्रीलंकेचे माजी खासदार तथा राष्ट्रपतीचे धार्मिक सल्लागार पु. भिक्खु अतुरलीय रतन महाथेरो यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री तथा बावीस प्रतिज्ञाचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र पाल गौतम (नवी दिल्ली), दिवंगत रोहित वेमुला (हैद्राबाद ) यांच्या मातोश्री राधिका वेमूला, राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील,माजी मंत्री आ.संजय बनसोडे,माजी मंत्री अमित देशमुख,आ. अभिमन्यू पवार,आ.रमेशप्पा कराड,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक इंजि.अनिलकुमार गायकवाड,जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर,जिल्हा पोलीस अधीक्षक सोमेय मुंडे,मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे,उपजिल्हा धिकारी डॉ.भारत कदम,पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.एस.पी.गायकवाड,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व समस्त लातूरकरांच्या वतीने समाजातील सामाजिक,धार्मिक, आर्थिक,प्रशासकीय,संस्कृतीक क्षेत्रात कृतिशील योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रथमतःच राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत.याप्रसंगी देश विदेशातील भिक्खु संघाची धम्मदेसना रात्री उशिरा पर्यंत होणार आहेत.तिसऱ्या सत्रात सायंकाळी उशिरा सुप्रसिद्ध विद्रोही गायिका क्रांतीशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम होणार आहे.
    तेंव्हा या एक दिवसीय संपन्न होणाऱ्या सातव्या अखिल भारतीय धम्म परिषदेस समस्त लातूर जिल्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भिक्खु पय्यानंद थेरो व बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!