August 9, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा कळंब येथे जाहिर निषेध

  • कळंब – भारत सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहानी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी द्वेषापोटी आंबेडकर…… आंबेडकर ……. असे म्हणण्यापेक्षा देवाचे नाव घेतले असते तर स्वार्गात जागा मिळाली असती अशी उपहासात्मक टिपणी करुन महापुरुषाचा अपमान करण्याचे सर्वोच्च सभागृहामध्ये भाष्य केले आहे.
    त्यामुळे अखिल भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणा-या अनुयायामध्ये द्वेषाची भावना निर्माण करण्यारे देशाच्या गृहमंत्र्यांनी करणे चुकीचे आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमीत शहा याचा त्वरीत गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा व समस्त भारत वासीयांची माफी मागावी अन्यथा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या कोणत्यााही खासदाराला रस्त्यावर फीरु देणार नाहीत.
    तरी जे कांही अनुचीत प्रकार घडतील त्यास भाजपा सरकार जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
    या निवेदनावर अनिल हजारे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना धाराशीव,अशोक कसबे पँथर सेना जिल्हाध्यक्ष,विशाल वाघमारे वंचित बहूजन आघाडी, धनंजय ताटे मानवहित लोकशाही पक्ष,सुरज वाघमारे , राहुल गाडे ,संजय भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    याप्रसंगी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळ्यास जोडे मारून जाळण्यात आला.
    यावेळी वंचित बहूजन आघाडी,रिपब्लिकन सेना,पँथर सेना व ईतर असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!