कळंब – परभणी येथे झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडी मध्ये झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस यंत्रणेची सखोल चौकशी करावी व मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याची सीआय डी मार्फत चौकशी करावी अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने कळंब येथील तहसीलदार हेमंत ढोकले यांना दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,परभणी येथे झालेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारका जवळ एका व्यक्तीने संविधानाच्या शिल्प प्रतिची विटंबना व अवमान केल्याप्रकरणी विटंबनेचा निषेध करणारे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली व पोलीस कोठडीत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी अशोक घोरबांडला यांच्यावर निलंबनाची कारवाई करून पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याची सीआयडी मार्फत चौकशी करून कायदेशीर मार्गाने न्याय द्यावा.अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे,बालाजी मिसाळ,नागेश धिरे,मुकेश गायकवाड,भारत कदम,अशोक पवार,ज्ञानोबा मुंडे,वैजनाथ मुंडे, प्रभू गायकवाड,संजय रणदिवे, गौतम हजारे, भिवाजी ताकपिरे,डी एस चंदनशिवे, बालासाहेब मासाळ, बाबासाहेब टोपे,आप्पासाहेब खुणे, संजय गायकवाड यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी