कळंब – वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच वाशी तालुक्यातील गायरान अतिक्रमित धारक शेतकऱ्यांच्या नावे गायरान पट्टे करावे व इत्यादी मागण्यासाठी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच यासह इतरही मागण्या करण्यात आल्या वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार,श्रावण बाळ सेवा योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ काळ योजना,यांच्या पेन्शन वाटपामध्ये २०२२ पासून तफावत असून सातत्याने सर्वांनी श्रावणबाळ सेवा योजनेचे अर्ज भरून कोणाला तेराशे,पंधराशे, हजार रुपये पेन्शन देऊन पिळवणूक केली जाते आहे.केंद्र सरकारचा वाटा आला नाही असे म्हटले जाते.आला तरी अनेक लाभधारकांना दिला जात नाही, याची सखोल चौकशी होऊन सर्वांना समान पेन्शन वाटप करण्यात यावी.वाशी तालुक्यातील १९८५ पासून अठरा गावातून भूमिहीन दलित आदिवासी यांनी शासकीय पड गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पिके काढून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. सातत्याने निवेदने,धरणे, आंदोलने करून देखील कसलीही कारवाई होत नाही. यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव,मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई,व तहसील कार्यालय वाशी यांच्याकडे पुरावे दाखल केलेले आहेत.तरी वस्तूस्थितीची पाहणी करून अतिक्रमित गायरान धारकांच्या नावे सातबारा देण्यात यावा.एकल महिला,विधवा, परीतक्त्या,आर्थिक दुर्बल, गोरगरीब यांना २१ हजार वार्षिक उत्पन्नाचे ऐवजी ५१ हजार रुपयाची आट लागू करा.व सर्वांना संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ सेवा योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना,एकल महिला विधवा, परीतक्त्या यांना पेन्शन लागू करावी.वाशी तालुक्यातील मागासवर्गीय,आदिवासी यांना गावोगावी स्मशानभूमी देण्यात यावी व असलेली स्मशानभूमी नावावर करून ताबा देण्यात यावा,विभक्त कुटुंबांना शिधापत्रिकेची फोड करून नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात यावी,व सर्वांना रेशनचा लाभ देण्यात यावा.अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या निवेदनावर श्रावण क्षीरसागर,रामभाऊ लगाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन