August 8, 2025

सावित्रीबाई फुले विद्यालयात महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्राचार्य काकासाहेब मुंडे, उपप्राचार्य डॉ.मीनाक्षी शिंदे- भवर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शंकर गोंदकर,सोमनाथ सावंत उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मुंडे व सहशिक्षक जीवनसिंह ठाकूर यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले विचार मांडले. त्याचबरोबर विद्यालयातील शिवकन्या देशमुख,अनोखी गायकवाड,स्नेहा जोगदंड यांनी विचार मांडले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले
    यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!