August 8, 2025

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळंब शहरातील बालोद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याचबरोबर भीम नगर,कल्पना नगर,इंदिरानगर,समता नगर,पुनर्वसन सावरगाव,आंबेडकर चौक या ठिकाणीही बुद्ध वंदना घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.
    अभिवादन कार्यक्रमात माजी आमदार दयानंद गायकवाड, कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप,सतपाल बनसोडे,सुनील गायकवाड,बंडू बनसोडे,शिवाजी शिरसाट ,प्रमोद ताटे,सुमित रणदिवे,मारुती गायकवाड ,सी.आर.घाडगे, सचिन गायकवाड ,संतोष भांडे, शहाजान शिकलकर ,राजाभाऊ गायकवाड ,सचिन तिरकर,भाऊ कुचेकर ,सुदीप देवकर,राऊत मेजर,महावीर गायकवाड, बाळासाहेब हौसलमल,बुवा वाघमारे,मुकेश गायकवाड, बजरंग बचुटे,दयानंद झेंडे ,मारुती हौसलमल ,धनंजय चिलवंत, नितीन कसबे यांच्यासह असंख्य बौद्ध बांधव व कळंब शहरातील नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!