कळंब – कळंब येथील साई लक्ष अकॅडमीची विद्यार्थिनी अनुजा प्रजासिंह राजपूत हिची उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदी निवड झाली आहे.या निवडीबद्दल अनुजा प्रजासिंग राजपूत हिचा साई लक्ष अकॅडमी,अभ्यासिका येथे आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त अधीक्षक द्रोणाचार्य पुरी यांच्या हस्ते सत्कार व मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी अनुजाचे वडील प्रजातसिंग राजपूत,सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव,साई लक्ष अकॅडमीचे संचालक हनुमंत पुरी, शिक्षिका शारदा पुरी,राज बिकड व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन