August 9, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आजच्या विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे – ज्ञानेश्वर हावळे

  • मोहा – “भारताच्या जडणघडणीत संविधानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ‘शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही शिकवण आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शन ठरवावे असे प्रतिपादन समृद्ध समाज फाउंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक तथा लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सदस्य विचावंत ज्ञानेश्वर हावळे यांनी केले.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार विद्यालय,मोहा ता.कळंब येथे दि.६ डिसेंबर २०२४ रोजी कायदेपंडित भारतीय राज्यघटनेचे प्रमूख शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रमिथ फाउंडेशनचे ग्रीन एज्युकेशन मुव्हमेंट इन स्कुल प्रकल्प संभाजी नगरचे प्रशिक्षक सामाजिक कार्यकर्ता,विचारवंत व अभ्यासक ज्ञानेश्वर हावळे यांचा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी हावळे हे बोलत होते. त्यांनी संविधानाच्या मुळ तत्त्वांवर प्रकाश टाकत म्हटले की, “भारतीय संविधान हे जगातील सर्वसमावेशक संविधान असून,त्याचा प्रत्येक कलम भारतातील प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीचा मार्ग सुकर करते.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना भारतातील विविधतेचा विचार करून समानतेचे तत्त्व मांडले.त्यांच्या विचारांवर विद्यार्थ्यांनी भविष्यातील समाज घडवावा व शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद आहे. डॉ.आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र हा केवळ व्यक्तिगत प्रगतीसाठी नाही,तर समाजाच्या उन्नतीसाठी आहे. विद्यार्थ्यांनी संघटित होऊन अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचे बळ विकसित करावे.”असे आवाहन केले.

  • या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप हे होते तर प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे,सहशिक्षक सूर्यकांत गुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.नवनाथ करंजकर व आभार प्रा.देवदत्त पाटील यांनी मानले.
    कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!