August 9, 2025

हजेरी सहायक यांनी पुरावे,कागदपत्रे सादर करावे ; उपजिल्हाधिकारी(रोहयो) यांचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हयातील सर्व मस्टर असिस्टंट कर्मचारी (हजेरी सहाय्यक) यांना जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.अवमान याचीका क्रं.८७८/२०२३ मधील मा. सर्वोच्य न्यायालय दिल्ली यांचे आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता उपसचिव, नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.जिल्ह्यातील काही मस्टर असिस्टंट कर्मचारी (हजेरी सहाय्यक) हे मिळून येत नाहीत.स्वतः त्यांनी किंवा मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले अभिलेख/कागदपत्र/पुरावेसह कर्मचारी ज्या कार्यालयामधून सेवानिवृत्त झाला आहे,त्या कार्यालयाशी किंवा उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे संपर्क साधावा.असे आवाहन उपजिल्हाधिकारी, (रोहयो),प्रविण धरमकर यांनी केले आहे.
error: Content is protected !!