August 9, 2025

समाज कल्याण विभागाचा पुढाकार ज्येष्ठ नागरिक दिवस उत्साहात साजरा

  • धाराशिव (जिमाका) – १ ऑक्टोंबर जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो.यावर्षी १ ऑक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधि सेवा प्रधिकरणचे सदस्य सचिव वसंत यादव हे उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिक संघटनेचे इतर मान्यवरही उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहु महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा,चर्चासत्र घेण्यात आले.समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणा-या वयोश्री व तिर्थदर्शन योजनेची माहिती देण्यात आली.तसेच आई-वडील व जेष्ठ नागरिक यांचे कल्याणार्थ निवाह योजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
    सर्व उपस्थित मान्यवरांचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रमाचे शेवटी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यची तपासणी करण्यात आली. कार्यालयाचे कर्मचारी बाळासाहेब तांबटकरी यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक बी.यु जगताप यांनी केले.
error: Content is protected !!