कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – कळंब तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार (पुरवठा) मुस्तफा खोंदे यांचा दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयामध्ये मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. खोंदे यांची लातूर जिल्ह्यातील औसा तालुका येथे बदली झाली असल्याचे त्यांनी या सत्कार प्रसंगी सांगितले.गेल्या तीन वर्षांपासून पुरवठा विभागाचे व ईतरही विभागाचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल नागरिकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. या सत्कार प्रसंगी मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे, पुरवठा विभागाचे नरहरी लोकरे,सामाजिक प्रतिष्ठान ताजखाॅ नशिबखाॅ पठाण या वेळी उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन