कळंब (बालाजी बारगुले ) – दि. २९ सप्टेंबर रोजी अंडर १९ कबड्डी मुली क्रीडा स्पर्धा धाराशिव येथील हातलाई मंगल कार्यालय येथे पार पडल्या. यामध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा दणदणीत विजय झाला आहे.अंतिम सामन्यात कै. महारुद्र बप्पा मोटे जूनियर कॉलेज परंडा संघाचा ३९ विरुद्ध ११ एवढ्या फरकाने पराभव करून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा संघ धाराशिव जिल्ह्यात प्रथम आला व लातूर विभागासाठी निवड झाली.या संघामध्ये रेवती भोसले, संचिता यादव,अपूर्वा भराटे, साक्षी भराटे,अमृता कुरुंद, श्रावणी कुरुंद,पूजा कुरुंद, रूपाली कुरुंद,प्रांजली भराटे, साक्षी भराटे,ज्योती माळी,भैरवी पवार यांचा समावेश होता व त्याच्या यशासाठी अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, लक्ष्मण मोहिते, श्रीमती वायभासे सरस्वती यांनी मेहनत घेतली तसेच संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार,उपप्राचार्य डॉ हेमंत भगवान ,डॉ.कमलाकर जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी