August 9, 2025

कळंब येथे हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस

 

  • कळंब – कळंब येथे प्रति वर्षाप्रमाणे हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए- मिलादुन्नबी निमित्त दिनांक २२ सप्टेंबर रविवार रोजी भव्य जुलूस काढण्यात आला सकाळी ११ वाजता मक्का मजीत ढोकी रोड येथून या भव्य जुलूस मिरवणुकीस उत्साहात सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली,तसेच चार चाकी वाहनावर मक्का,मदिना येथील मस्जिद प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या तसेच या जुलूसच्या अग्रभागी ५ उंट ,तसेच उर्दू शाळेतील विद्यार्थी,आबाल वृद्धांचा सहभाग होता.मिरवणूक मार्गात फटाके वाजवण्यात आली तसेच विविध समाजसेवी संघटनांच्या वतीने सरबत, मसाला दूध,पाणी,केळी, बिस्किटाचे वाटप करण्यात आले. मिरवणूक मक्का मस्जिद ढोकी रोड कळंब,छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक, बागवान चौक,कथले चौक,भोई गल्ली,कसई मोहल्ला मार्गे माबुद बाबा दर्गा येथे पोहोचली. यानंतर लंगर ( खाना ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या जुलूस मध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
    ही मिरवणूक मेन रोड कळंब येथे आली असता मिरवणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व मिरवणुकीतील युवक यांच्यात डीजेच्या ( डिसेबल ) आवाजावरून वाद व बाचाबाची झाली व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.दरम्यान काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.पोलिसांनी डीजे जप्तीची कारवाई केली आहे.
error: Content is protected !!