धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 172 कारवाया करुन 1,42,650 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
आनंदनगर पोलीस ठाणे: दि.19.09.2024 रोजी 18.15 ते दि.20.09.2024 रोजी 05.00 वा. सु. नगरपरिषद धाराशिव येथे उभा केलेले स्वराज कंपनीचा लाल रंगाचा हेड क्र एमएच 11 डीएन 5714 व दोन चाकी डंपींग ट्रॉली असा एकुण 1,60,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सागर शेषेराव प्रधान, वय 24 वर्षे, रा. पिंपळी धामनगाव ता. परतुर जि.जालना, ह.मु. समतानगर धाराशिव यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-जयवंत श्रीमंत सुर्यवंशी, वय 39 वर्षे, रा. घारगाव ता. परंडा जि. धाराशिव यांचे एच पी पेट्रोलपंपासमोर बार्शी रोड परंडा समोरील इरिगेशन सिस्टीमच्या दुकानाचा पाठीमागील बाजूचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि.20.09.2024 रोजी 19.30 ते दि.20.09.2024 रोजी 09.30 वा. सु. उचकटून आत प्रवेश करुन दुकानातील 20 एमएम चे रेन पाईप 5 गोणी 50 बंडल, 40 एमएम रेन पाईप 10 गोणी 60 बंडल, 20 एमएमचे पेप्सी 110 बंडल,16 एमएम पेप्सी 60 बंडल, रेन पाईप फिटींग साहित्य, बॉलहॉल दोन डाग व रोख रक्कम 5,000₹ असा एकुण 3, 27, 040 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जयवंत सुर्यवंशी यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण.” आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- कुलदिप कदम उर्फ पप्पु, अमोल लुगंसे, सुनिल अंबेकर प्रविण लुगंसे रा. समता नगर ता.जि. धाराशिव यांनी दि. 18.09.2024 रोजी 17.00 वा. सु. नंबर शळेसमोरील पंटागणात धाराशिव येथे फिर्यादी नामे-बाबासाहेब राजाभाउ साठे, वय 47 वर्षे, रा. आळणी ता.ह.मु. समता कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील झालेले भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाबासाहेब साठे यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-सतिष सरडे, जयश्री सरडे, श्रध्दा सरडे, शंडु सरडे, भाग्यश्री इंगळे, किरण इंगळे, विशाल छत्रे सर्व रा. तुळजापूर यांनी दि. 18.09.2024 रोजी 18.00 ते 23.00 वा. सु. हडको तुळजापूर येथे फिर्यादी नामे- राजेंद्र दिगंबर माने, वय 53 वर्षे, रा. हाडको तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जाण्याचे रस्त्याचे कारणावरुन गैरकायद्याची मडंळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी या भाडंण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवगाळ करुन मारहाण करुन लाईटचा बोर्ड व पाण्याचे पाईप फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र माने यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2),189(2), 190, 324(4)(5), 329(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- मुसा दस्तगीर तांबोळी, इरफान मुसा तांबोळी, पाशा दस्तगीर तांबोळी रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 20.09.2024 रोजी 20.15 वा. सु. उमरगा ते सास्तुर जाणारे रोडलगत गोलंदाज मोबाईल शॉप चांदणी चौक बलसुर येथे फिर्यादी नामे-असद कबीर शेख, वय 27 वर्षे, रा.बरकत मस्जीदच्या पाठीमागे बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. वेताळ वसाहत चाळ क्र 231 उन्नती नगर हाडपसर गाडीतळ पुणे यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बतईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-असद शेख यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
“रस्ता अपघात.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-रोहीत परशुराम खंडागळे, व सोबत रमाबाई परशुराम खंडागळे वय 40 वर्षे, रा. रुई ता. बार्शी जि. सोलापूर हे दोघे दि.17.01.2024 रोजी 13.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 ईएन 5103 वरुन जात होते. दरम्यान बाळासाहेब शिंदे यांचे शेताजवळ जाधववाडी रोड धाराशिव येथे आरोपी नामे रोहीत खंडागळे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवल्याने रमाबाई खंडागळे या गाडीवरुन खाली पडून अपघात झाला. या अपघातात रमाबाई खंडागळे या गंभीर जखमी होवून उपचार मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- परशुराम तुकाराम खंडागळे, वय 46 वर्षे, रा. रुई ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश