August 9, 2025

राहूल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

  • कळंब – आरक्षण विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कथित विधान केल्यानं कळंब येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या नेतृत्वात राहूल गांधी यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
    कळंब शहरात भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक होत राहुल गांधी यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी केली.यावेळी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे म्हणाले की,काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भेट दिल्यानंतर आरक्षण रद्द करण्याबाबत कथित वक्तव्य केल्याचे विधान चुकीचे आहे. संविधानाचा राहुल गांधी यांनी अवमान करत आरक्षण रद्द करण्याची जी भाषा केली. आपल्या देशाची प्रतिमा देशाच्या बाहेर गेलेल्या प्रत्येक जाती-धर्माच्या माणसानं ठेवली पाहिजे. देशाचे नाव खराब करण्याचे काम राहूल गांधी यांनी केले.संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता; केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी.
    जोडो मारो आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी कळंब यांना राहुल गांधी यांच्या कथित आरक्षण विरोधातील वक्तव्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. या निवेदनावर तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,प्रणव चव्हाण, माणिक बोंदर,संताजी वीर, विकास कदम,गणेश त्रिवेदी, सुनिल गायकवाड,शिवाजी शिरसाट, सतपाल बनसोडे, किशोर वाघमारे,सचिन तिरकर, इलीयास खूरेशी,कुंदन गायकवाड,सायास जाधवर, संदीप बाविकर, राजकुमार यादव, परशुराम देशमाने,अनिल टेकाळे, शितल चोंदे, पिनु जाधवर,अरुण चौधरी,सचिन एडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!