August 9, 2025

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक शिबिर संपन्न

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय ,कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता कक्ष,महिला सक्षमीकरण कक्ष आणि सृष्टी सामाजिक विकास संस्था गडचिरोली , applus IDIADA पुणे ,लोकहीत सामाजिक संस्था मस्सा (खं) ता.कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ऑगस्ट २०२४ रोजी महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी ” मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता” या विषयावर एक दिवसीय रिफ्रेशर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत सुमारे २०० मुलींनी सहभाग घेतला.
    डॉ.मीरा दशरथ,आणि डॉ.प्रगती भंडारी हे कार्यशाळेचे संसाधन व्यक्ती होते.कार्यशाळेचा उद्देश राज्यात आयोजित करण्यात येत असलेल्या आरोग्य आणि स्वच्छता कार्यक्रमांशी संबंधित महिला आणि मुलींना आरोग्याविषयी ज्ञान देणे हा होता, जेणेकरून महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर अधिक चांगले काम करता येईल. सृष्टी संस्थेचे संस्थापक केशव गुरनुळे यांनी आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर उपस्थितांना संबोधित केले आणि त्यांना या विषयावर सक्रियपणे काम करण्यास प्रवृत्त केले. त्यांना मानसिक आरोग्याबाबतही सांगण्यात आले की कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी मानसिक आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे.यावेळी महिलांच्या आरोग्य सेवेचा एक दुर्लक्षित पैलू म्हणजे त्यांचं मानसिक आरोग्य.महिलांना अनोख्या आव्हानांचा आणि तणावाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे नैराश्य आणि तणावासारख्या मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी दूर करणे, जागरूकता वाढवणे आणि मानसिक आरोग्याच्या सेवा प्रदान करणे ही महिलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक पावले ठरू शकतात.असे डॉ. मीरा दशरथ म्हणाल्या ,आज देशातील महिलांच्या आरोग्यसेवा आणि स्वच्छतेची गरज फार मोठ्या प्रमाणावर आहे.मासिक पाळीतील स्वच्छता, प्रजननातील आरोग्य सेवा, पोषण, मानसिक आरोग्य आणि आरोग्य शिक्षण या सारख्या समस्यांचे निराकरण करून, आपण महिलांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो. महिलांसाठी निरोगी आणि अधिक समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी या आव्हानांना एकत्रितपणे ओळखणं आणि त्यांचं निराकरण करणं अत्यावश्यक आहे असे डॉ. प्रगती भंडारी यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच बहुतेक वेळा महिलांमध्ये हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमची कमतरता निर्माण होते त्यामुळे त्यांना अनेक आजार होतात.त्यांनी महिलांना त्यांच्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करावा असा सल्ला दिला. प्रा तुषार वाघमारे यांनी उपस्थितांना मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रचार करणे हे महिलांचे सन्मान, गोपनीयता, शारीरिक एकात्मता आणि परिणामी,त्यांची स्व-कार्यक्षमता यांचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.याची जागरूकता भेदभाव आणि लैंगिक समानतेचे एक सक्षम वातावरण तयार करण्यात योगदान देते,भेदभाव करणारे सामाजिक नियम,सांस्कृतिक निषिद्ध आणि मासिक पाळीशी संबंधित कलंक मुलींना असुरक्षित प्रथांचे पालन करण्यास प्रवृत्त करू शकतात असे प्रतिपादन केले ,तसेच कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात बाल लैगिक शोषण कायदा आणि जागरूकता बदल मंदा केळझरकर मॅडम (सृष्टी संस्था गडचिरोली) यांनी माहिती दिली APPlus IDIADA pune या संस्थेने सॅनिटरी किट चे वाटप करून कशी काळजी घायची आणि बाल लैंगिक शोषण याला कसा प्रतिबंध घालता येईल आणि आपली भूमिका काय असायला हवी याबद्दल मत मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी बाल लैगिंक शोषणाच्या चिन्हे आणि परिणामांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवणे यासारख्या उपायांचा समावेश असू शकतो. माहितीच्या प्रसाराची आणखी एक प्रभावी पद्धत म्हणजे शाळांमध्ये, शिक्षकांना,काळजीवाहूंना आणि अल्पवयीनांना गैरवर्तनाचे प्रकार, उपाय आणि अधिकार याबद्दल कार्यशाळा तयार करणे आणि जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे असे आवाहन केले.प्रा.अर्चना मुखेडकर यांनी प्रास्तविकात आपले मनोगत व्यक्त केले आणि सांगितले की महाविद्यालयात महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य जागृती कार्यक्रम नेहमी राबवत आहोत.ज्यामध्ये हिमोग्लोबिनआणि कॅल्शियमची कमतरता इत्यादी चाचण्या केल्या जातात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मीनाक्षी जाधव यांनी केले तर आयोजन महिला सक्षमीकरण कक्ष सदस्य डॉ.पल्लवी उंदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमर ताटे यांनी केले. या वेळी विवेक गिरी ,दीपाली काळे,अभिनित झा,सागर बोलभट (पुणे)तसेच कुणाल गुरनुळे,केशव गुरनुळे,प्रा.तुषार वाघमारे,सुधाकर श्रीसागर,राजू साठे (संकल्प मानव विकास संस्था परभणी)उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशवीरित्या पार पाडण्यासाठी अमर ताटे यांनी परिश्रम घेतले.व उपस्थिताचे लोकहीत संस्थेच्या वतीने आभार मानले.
error: Content is protected !!