August 9, 2025

अनोळखी मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका)- धाराशिव तालुक्यातील सांजा गावाशेजारील महार तळयातील पाण्यात बुडून एक अनोळखी व्यक्ती मयत झाल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी निर्दशनास आली.या घटनेची बी.एन.एस.एस मधील कलम 194 अन्वये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन आनंदनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
    सांजा गावाशेजारील झालेल्या या घटनेतील मयत अनोळखी आहे. त्याचे वय अंदाजे 55 वर्षे आहे.उंची 5 फुट असून मजबूत शरीर बांध्याचा आहे.गोऱ्या रंगाचा असून चेहरा गोल केस काळे-पांढरे आहे.या व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास पोलिस निरीक्षक एस.आर.थोरात मो.नं.-9870090958, सपोफौ एम.एम.पवार मो.नं.9604057117 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आनंदनगरचे पोलिस निरीक्षक एस.आर.थोरात यांनी केले.
error: Content is protected !!