August 10, 2025

जाधव प्रशांत यांचे श्री तुळजाभवानी संस्थानात सहाय्यक जनसंपर्क अधिकारीपदी निवड

  • कळंब – साईलक्ष करीअर अभ्यासिकेचे विद्यार्थी जाधव प्रशांत अशोक यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पदभरतीत सहायक जनसंपर्क अधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांनी बी ई हे उच्चशिक्षण घेतले असून वृत्तपत्रविद्यापन पदविका घेतलेली होती. मागील एक वर्षापासून साईलक्ष अकॅडमी येथे अभ्यासिकेत सकाळी ०७ ते रात्री ०९ पर्यंत एकूण १४ तास दररोज अभ्यास केल्यामुळे फक्त एका वर्षात अधिकारीवर्गिय पदाला गवसणी घातली आहे. प्रशांत जाधव यांच्या निवडीबद्दल ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजीक संस्थेचे अध्यक्ष बंडू (आबा) ताटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक हनुमंत पुरी, संचालिका शारदा पुरी,अशोक धोंगडे,शक्ती चव्हाण, संकेत लाटे, ज्ञानेश्वर सुरवसे, धैर्यशील मडके उपस्थित होते.
error: Content is protected !!