धाराशिव (जिमाका)- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ” घरोघरी तिरंगा “हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरांवर,आस्थापनांवर आणि दुकानांवर तिरंगा लावून तसेच या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमात सहभाग घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले . दि. 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा ग्राम विकास यंत्रणेच्या संचालक प्रांजल शिंदे, उपजिल्हाधिकारी संतोष भोर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.ओंबासे यावेळी पुढे म्हणाले,अनेक ठिकाणी वा-याने तिरंगी झेंडे जमिनीवर पडतात.अशावेळी तिरंग्याचा अवमान होऊ नये यासाठी शहरी भागात नगर परिषद आणि नगर पंचायतींनी तसेच जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात एक टीम आणि नोडल अधिकारी नियुक्त करून झेंड्यांचा अवमान होणार नाही यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करावी.नगर परिषदेने शहरातील अनाधिकृत झेंडे,फलक आणि होडिंग हटवावेत.शहरात स्वच्छता मोहीम राबवावी.कुठेही घाण दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी . तसेच आजादी का अमृत महोत्सव साजरा करतांना शहरात स्वच्छता आणि रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतीतही संबंधित विभागांना डॉ.ओम्बासे यांनी सूचना केल्या. यावेळी घरोघरी तिरंगा आणि स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले.संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी , तसेच या प्रसंगी कुठल्याही प्रकारचा शिष्टाचार भंग होणार नाही,याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे असेही डॉ.ओम्बासे यावेळी म्हणाले .
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी