कळंब – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती कार्यक्रमाचे भारतीय बहुजन परिवर्तन सेनेच्या वतीने दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी अजित ग्लास व फर्निचर बाबानगर कळंब येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, ज्येष्ठ नागरिक नागोराव भंडारे, भारतीय बहुजन परिवर्तन सेनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे खेर्डा गावचे माजी सरपंच विक्रम भंडारे,धनंजय ताटे,जगदीश महाजन,सुरज गायकवाड,आश्रुबा शिंदे ,सुनील गायकवाड, राकेश घोडके, विनायक रामढवे, भगीरथ बोराडे ,अजित भंडारे ,विशाल भंडारे ,राजाभाऊ बेडके ,दीपक पांचाळ यांनी अभिवादन केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन