May 13, 2026

शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना मोहेकर मल्टीस्टेटच्या कळंब शाखेत अभिवादन

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष, चेअरमन हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप.क्रे.सोसायटी लिमिटेड मोहा शाखा कळंब येथे दिनांक २७ जुलै २०२४ रोजी अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी कळंब शाखा अधिकारी फुलचंद मडके यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
    याप्रसंगी मल्टीस्टेटचे कर्मचारी राहुल मडके,योगेश मुळे, सोमनाथ कातमांडे,तुषार साठे, अनिकेत मडके,विशाल निपाणीकर,श्रद्धा जोशी आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!