August 8, 2025

आरटीओ कार्यालयाकडून २७० वाहनांची तपासणी

  • धाराशिव (जिमाका) – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धाराशिवच्यावतीने २७० वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाच मद्य प्राशन करणारे चालक आढळून आले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने 25 जुलै रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी वायु वेग पथक ॲक्शन मोडमध्ये काम करीत आहे.
  • रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी सतत वाहनांच्या वेगाची तसेच वाहन चालविणाऱ्या चालकांकडे आवश्यक ते सर्व कागदपत्र सोबत बाळगलेली आहेत किंवा नाही तसेच चालकाने मद्यप्राशन केले आहे का याची पाहणी वायु वेग पथकाच्या माध्यमातून केली जाते.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायु वेग पथकाच्या अधिकाऱ्यांनी धाराशिव -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल नाका येथे २७० रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. या दरम्यान,२७० वाहन चालविणाऱ्यांपैकी पाच जण मद्य प्राशन करून वाहन चालवीत असल्याचे निदर्शनास आले.दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघात होतात.त्यामुळे स्वतः चालक,प्रवासी, पादचाचारी व रस्ता वापरकर्त्यांच्या जीवाला धोका होण्याचा संभव असतो.नशेमध्ये वाहन चालविल्यास वाहनावर नियंत्रण मिळविणे अवघड होते.वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहनावर नियंत्रण मिळविण्यास तो अपयशी ठरतो. त्यामुळे अपघात,दुखापत व मृत्यू देखील होऊ शकतो.
  • विशेष म्हणजे मद्य प्राशन करून वाहन चालविणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे.या तपासणी दरम्यान आढळलेल्या ५ मद्यपी वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली.ही धडाकेबाज कारवाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान, दत्तात्रय पांडकर,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजित पवार,सुजित वाघमारे,अक्षय बोदर,सोहेल मुजावर, वाहन चालक गोरख बोधले व निलेश खराडे यांनी केली.
error: Content is protected !!