August 9, 2025

श्रावस्ती बुद्ध विहारात पु.भिक्खु धम्मबोधीचे अधिष्ठान सुरू

  • लातुर – शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्ट संचलीत श्रावस्ती बुद्ध विहाराचा 16 वा वर्षावास धम्मग्रंथ वाचन आणि पुज्य भिक्खु धम्मबोधी यांचे अधिष्ठान आरंभ झाले.
    यावेळी श्रावस्ती महिलामंडळाच्या अध्यक्षा कुसुम बानाटे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावास आरंभ झाला.सकाळी ठिक:10:00 वाजता ज्योती घारगावकरच्या नेतृत्वात बुद्धभिमाला धुप,दीप,पुष्पाने वंदन करत बुद्ध वंदना घेतली.आणि सायंकाळी ठिक5:00पुज्य भिक्खु धम्मबोधी पानगाव यांच्या अधिष्ठानाला आरंभ होण्यापुर्वी भंतेजींना पुष्पवृष्टीने बुद्ध विहारात आणले.नंतर प्रतिभा सावळे यांनी याचना घेतली.भंतेजींनी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ,बुद्ध निर्मीती आणि आषाढ पौर्णिमा वर्षावासारंभ तथा गुरु पौर्णिमेचे महत्व सांगत शीलसदाचारी माणुसच होणे मंगल आहे.यातच सर्वांचे कल्याण आहे.असे धम्मदेसनेतुन सांगीतले. धम्मग्रंथाचे वाचन प्रतिभा सावळेंनी केले. धम्मपालन गाथेनी सांगता केली.यावेळी कांताबाई कांबळे,कविता भालेराव,महादेवी वाघमारे,पुष्पा शिंदे,रमा भुई,शीला शेवाळे,सुनिता मस्के या दानदात्यांचा पुष्पहार देवुन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन विलास घारगावकरनी केले.यावेळी खीरदान सुकुमार गोरेंनी केले.तर पुष्पा शिंदेंनी केळी वाटप केली.मोठ्या संख्येनी लहानथोर ऊपासक,ऊपासिका हजर होते.
error: Content is protected !!