August 9, 2025

गडदेवदरी येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन

  • धाराशिव – मौजे गडदेवदरी ता.जि.धाराशिव येथे तीन एकर जागेत नव्याने तगरभूमी बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात येत आहे.
    धाराशिव जिल्ह्यातील बौद्ध उपासकांना वर्षावास काळात धम्मदेशना मिळावी म्हणून रविवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ रोजी वर्षावास महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये पूज्य भिक्खू महा विरो थेरो,पय्यानंद थेरो,पय्यावंश, बुद्ध शील, श्रामनेर राहुल यांची प्रमुख धम्मदेशना होणार आहे.
    तरी जिल्ह्यातील बौद्ध उपासकांनी तगरभूमी जेतवन बुद्ध विहार गडदेवदरी परिसर येथील वर्षावास महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पूज्य भिक्खू सुमेधजी नागसेन यांनी केले आहे.
error: Content is protected !!