August 9, 2025

इनरव्हील क्लब कळंबच्या अध्यक्षपदी सौ‌.प्रतिभा भवर .

  • कळंब -दि.२१ जुलै २०२४ रोजी महावीर भवन कळंब येथे रोटरी क्लब ऑफ कळंब व इनरव्हिल क्लब कळंबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या क्लबच्या पदग्रहण समारंभात २०२४-२५ या वर्षाकरिता ही इनरव्हिल क्लबच्याअध्यक्षपदी सौ‌.प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे) निवड करण्यात आली आहे.
    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जगन्नाथ दीक्षित (सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ), रो. गणेश मुळे (उपप्रांतपाल रो. जिल्हा ३१३२), यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे यांनी मावळते अध्यक्ष रवी नारकर यांच्याकडून पदभार स्वीकारला तर इनरव्हील क्लब नूतन अध्यक्ष प्रतिभा भवर यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. आकांक्षा पाटील यांच्याकडून तर नूतन सचिव म्हणून डॉ. प्रियंका आडमुठे यांनी पदग्रहण केले. याप्रसंगी रोटरी क्लब कळंब सिटी च्या वतीने देण्यात येणारा कळंब भूषण पुरस्कार यावर्षी कळंब तालुका भाट शिरपुरा येथील रहिवाशी व पिंपरी चिंचवड येथील तरुण उद्योजक दिनेश सूर्यकांत वाघमारे यांचा ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दीक्षित जीवनशैली बदलातून वेट लॉस व मधुमेह मुक्ती या विषयावर उद्बोधन केले त्यांनी आपल्या उद्बोधन मार्गदर्शनात असंतुलित आहार व त्यामुळे वाढणारे वजन व मधुमेह आजार याविषयी बोलत असताना मधुमेह आजार काय आहे तो कसा होतो? कमी करण्यासाठी व टाळण्यासाठी डॉ. दीक्षित यांनी दीक्षित जीवनशैली या विषयी माहिती देत असताना देशभर देशात या जीवनशैलीचे अनुकरण होत असून आयुष्य बदलून टाकणारा अनुभव ठरत आहे. या जीवनशैलीचे अनुकरण करण्यास मार्गदर्शन केले. शरीराला गरज असलेली साखर जेवणातून मिळते त्यामुळे गोड खाणे टाळावे असा सल्ला त्यांनी दिला.
    दीक्षित यांचे देशात व परदेशात लाखो फॉलोवर्स असून ४१ देशात त्यांचे व्याख्यानं झाली आहेत. तर याप्रसंगी कळंब भूषण पुरस्कार प्राप्त दिनेश वाघमारे म्हणाले की, चांगले कार्य करीत राहिले तर आपोआप पुरस्कार मिळतात यासाठी वेळ व दिशा महत्त्वाची आहे. दृढ संकल्प चिकाटी व मेहनत गरजेचे आहे असे सांगितले. तर गणेश मुळे सहप्रंतपाल यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, कळंब रोटरी क्लब व इनरव्हील चे काम उत्कृष्ट असल्याचे सांगितले.
    सौ‌.प्रतिभा बाळकृष्ण भवर यांच्या अध्यक्षपदाखाली झालेल्या नवीन कार्यकारणीमध्ये सेक्रेटरीपदी डॉ प्रियंका धनंजय आडमुठे,उपाध्यक्षपदी , डॉ.वर्षा कस्तुरकर,,खजिनदारपदी सौ.राजश्री देशमुख,,आयएसओ पदी डॉ . दिपाली लोंढे,एडिटरपदी सौ.वैष्णवी दशरथ,क्लब पत्रव्यवहारपदी सौ.संगिता घुले तर सल्लागार समितीमध्ये सौ.रेखा तिर्थकर ,सौ.निता देवडा, डॉ.मिनाक्षी भवर,सौ.निशा कळंबकर, डॉ.सुनंदा अनिगुंठे, डॉ . आकांक्षा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. एकूण ३४ मेंबर असणा-या या क्लब मध्ये यावर्षी सौ.वेदिका जाधवर व सौ.उज्ज्वला लोमटे यांचा नवीन प्रवेश झाला.यावेळी झालेल्या पदग्रहण समारंभात मावळत्या अध्यक्षा डॉ ‌आकांक्षा पाटील यांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्दल सदस्यांचे सुंदर असे सदस्यांचे फोटो असणारे प्रिंटेड कप व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. व वर्षभरात केलेल्या प्रकल्पांची माहिती प्रोजेक्टर सादरीकरण केले.नूतन अध्यक्षा सौ.प्रतिभा भवर यांनी,नवीन वर्षात होणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली व सर्व सदस्यांना वर्षभरात होणाऱ्या प्रकल्पात उत्साहाने सामील होऊन सहकार्य करण्याची विनंती केली. क्लबमधील सदस्या डॉ .मेघा आवटे हिचा वाढदिवस व गुरूपौर्णिमा केक कापून साजरी केली.या सर्व कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन सौ.संगिता घुले यांनी काम पाहिले.त्यांना क्लबमधील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
    हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ कळंब व इनरव्हिल क्लब कळंबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.रो.प्रा.संजय घुले व रो.श्री.सुशिल तिर्थकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि डॉ.साजेद चाऊस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
error: Content is protected !!