August 9, 2025

वर्षावासास प्रारंभ

  • कळंब – कळंब शहरातील समता नगर बुद्ध विहारामध्ये गुरुपौर्णिमेपासून वर्षावासास प्रारंभ झाला असून अश्विनी पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास सुरू राहणार आहे.
    शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या बद्धसृष्टी येथे तथागताच्या धर्म प्रवर्तन दिनाच्या पर्वात सहभागी होऊन कुशल कर्म,सुख,वैभव यावर आर्या मेत्ताजीची धम्मदेशना झाली असून प्रत्येक रविवारी अष्टशिल, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन,प्रति युत्य समोत्तपाद, अष्टांगिक मार्ग,चार आर्य सत्य, कर्म सिद्धांत,कार्यकरण भावसिद्धांत समजावून सांगितले जाणार आहेत.
    तरी या वर्षवास पर्वात बुद्ध धम्म अभ्यास करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बुद्धसृष्टीच्या संयोजकांनी केले आहे.
error: Content is protected !!