September 13, 2026

कळंब शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट,न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष..!

  • कळंब (साक्षी पावनज्योत ) – शहरातील बार्शी रोड, परळी रोड आणि ढोकी रोडवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे वाहनास अडथळा होत असून वाहन चालकांचा जीव कासावीस होत आहे तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
    या मोकाट जनावरामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत न.प.प्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी जनतेतून मागणी होत आहे.

 

error: Content is protected !!