August 9, 2025

धाराशिव तालुक्यातील नागरिकांनी ई- केवायसी करावी अन्यथा रेशन मिळण्यास अडचण

  • धाराशिव (जिमाका) – धाराशिव तालुक्यातील नागरिकांना आता शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करून घेणे अनिवार्य झाले आहे.गॅस सबसिडी असो वा बँकेत खाते सुरू ठेवायचे असो,केवायसी गरजेची असून आता रेशनवरील धान्य पाहिजे असेल तर ई-केवायसी करणेही शासनाने अनिवार्य केले आहे.
    ई-केवायसी नसेल तर मोफत योजनेतील धान्य,अनुदान मिळणार नाही.यासाठी शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी लवकर करून घ्यावी. असे आवाहन धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.
  • ई-केवायसी म्हणजे नो यूअर कस्टमर म्हणजे आपले ग्राहक जाणून घ्या, असा त्याचा अर्थ होतो.त्यामध्ये ‘ई’ जोडले तर इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर अशी त्याची ओळख होते. आता ही एक डिजिटल प्रक्रिया आहे. अंगठ्याचा,बोटांचा ठसा किंवा डोळ्यांचे स्कॅन करून पूर्ण केली जाते.
  • सरकारने रेशन दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य,काही रेशन कार्डधारक यांना धान्याऐवजी त्यांचे बँक खात्यावर सबसिडी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.आता धान्य किंवा सबसिडी नेमक्या त्याच लाभार्थीपर्यंत पोहोचते का,त्याच्या नावावर इतर कोणी या योजनेचा गैरफायदा घेतोय का यासाठीही ई-केवायसी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.गाव तेथे रेशन दुकान” आहे.या रेशन दुकानदारांना प्रशासनाने जास्तीत जास्त ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहेत.यासाठी मुदतही निश्चित करण्यात आलेली आहे.
  • ज्या रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाहीत,त्यांचे धान्य किंवा सबसिडी बंद होऊ शकते,त्यामुळे रेशन दुकानात ई-केवायसी करून घ्यावी.धाराशिव तालुक्यात काही लाभार्थी ई-केवायसी करण्यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
  • रेशन दुकानात करता येते ई-केवायसी
  • ई-केवायसी म्हणजे काय व ती कोठे करायची,असा प्रश्न अनेक रेशनकार्डधारकांना पडतो.आपल्या गावातील म्हणजे आपण जेथे रेशनचे धान्य भरून घेतो तेथे बोट लावून ई-केवायसी करावी.धाराशिव तालुक्यात एकूण रेशनकार्ड लाभधारकांची संख्या 2 लाख 78 हजार 83 आहे.त्यात 21 हजार 268 नागरिकांचे ई-केवायसी झालेले आहे. तर 2 लाख 56 हजार 815 नागरिकांचे केवायसी बाकी आहेत. अशी माहिती तहसील कार्यालय पुरवठा विभागातून देण्यात आली.प्रशासनाने रेशन दुकानदारांना ई केवायसी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • धाराशिव तालुक्यातील रेशनकार्डधारकांनी जेथे धान्य घेतो त्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. ई-केवायसी नसणाऱ्यांना पुढे धान्य किंवा सबसिडीस अडचण येऊ शकते अशा सुचना तहसीलदार डॉ.जाधव यांनी दिल्या आहेत.
error: Content is protected !!