धाराशिव- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून श्री संत गजानन महाराज शेगाव पालखी सोहळा धाराशिव येथे आगमन झाल्यानंतर वारकरी भाविक-भक्तासाठी औषध उपचार,आरोग्य तपासणी व फिजिओथेरपी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या तपासणी शिबिरात सुमारे ७०० भाविक भक्तांनी फिजिओथेरपी उपचार करून औषध उपचार केले.यावेळी डॉ. व्ही.पी.एज्युकेशनल कॅम्पसमधील वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे डॉक्टर व विद्यार्थी बांधवांनी सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक कुणाल निंबाळकर,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश तांबारे,अमोल सुरवसे,जयंत देशमुख पाटील,बलराज रणदिवे,मुकुंद देशमुख,फाद सय्यद,झैद शेख,सरफराज पटेल,डॉ.गणेश सर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्वेता दुरुगकर,डॉ. पूजा आचार्य,ओंकार सुतार,प्रा.हरी घाडगे,प्रा.अमर कवडे,निखिल शेरखाने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन