August 8, 2025

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

  • धाराशिव (जिमाका) – स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पद्धतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 2007 पासून केंद्र शासनाने घेतला आहे.
    त्या अनुषंगाने सांख्यिकी दिनाचा कार्यक्रम आज शनिवार, दि. 29 जून रोजी सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्हा सांख्यिकी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या सांख्यिकी दिनाची “Use of Data for Decision Making” ही थीम ठरविण्यात आली होती.
    या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक रामराज पडवळ तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!