August 9, 2025

ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

  • मोहा- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२१ जून रोजी मोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी वेगवेगळी योगासने केली. योगशिक्षक प्रा. राहुल भिसे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच उत्तम आरोग्यासाठी व एकाग्रतेसाठी योगासने कशी महत्त्वाची भूमिका बजावतात याविषयी मार्गदर्शन केले.. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक सुनिल साबळे, क्रिडा विभाग प्रमुख संजय मडके यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवनाथ करंजकर यांनी केले.
    पर्यवेक्षक संभाजी गिड्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
error: Content is protected !!