August 9, 2025

प्रवेश घेतलेल्या नवोदित गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

  • लातूर (दिलीप आदमाने ) –
    श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसेश्वर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची प्रवेश प्रक्रिया दि. २८ मे २०२४ पासून स. १० ते साय. ०६ वा. पर्यंत (रविवार व सुट्टीच्या दिवशी सह) कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी कला,वाणिज्य,विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रम आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस.डब्यूव . व बी.सी.ए. प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू झालेले आहेत. याला विद्यार्थी व पालकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
    प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसह पुष्पगुच्छ व पेन देवून सत्कार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश समितीतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    अकरावी विज्ञान शाखेत आजपर्यंत ९० टक्केच्या वर ०७ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतलेला आहे. यामध्ये बेल्हाळे श्रुती विकास (९८ टक्के), कुरेशी बुशरा साहेब लाल (९६.६० टक्के), कांबळे प्रतीक्षा शिवाजी (९२.८० टक्के), चव्हाण मानसी मनोज (९२.६० टक्के), प्रयाग रूद्र राजेश (९१.४० टक्के), गदाडे श्रुती प्रभाकर (९१.४० टक्के), पांचाळ वरद प्रवीण (९०टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
    अकरावी वाणिज्य शाखेत आजपर्यंत ८० टक्केच्या वर ०८ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला आहे. यामध्ये नाईकवाडे आयोध्या बाळासाहेब (८९.६० टक्के), मोठेराव तुळशी लक्ष्मण (८९.६० टक्के), जाधव स्वप्नांजली अंबादास (८६.८० टक्के), वाघमारे अंकिकेत उमाकांत (८६.६० टक्के), लोंढे अनिकेत बालाजी (८४.०० टक्के), गथाडे स्वीटी अंबादास (८२.६० टक्के), घोडके ऋषिकेश बालाजी (८२.४० टक्के), यादव अमर सतीश (८१.६० टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
    अकरावी कला शाखेत (८० टक्के) च्या वर ०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पठाण अवेदखा अमजदखा (८९.८० टक्के), कांबळे सायली गोरखनाथ (८३.८० टक्के), स्वामी काशिनाथ सोमनाथ (८०.४० टक्के), कूकर स्नेहल नर्सिंग (८०.२० टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
    वरिष्ठ महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला ११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये आळंदकर राधा (७९.०० टक्के), आळंदकर शुभांगी (७१.८३ टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
    बी. कॉम. प्रथम वर्षाला ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये राठी नितल (८४.१७ टक्के), मेनशेट्टी आदिती (८०.६७ टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
    बी. एस्सी. प्रथम वर्षाला ११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये कुरील प्रीती (७२.१७ टक्के) या विद्यार्थ्याथिणीचा समावेश आहे.
    बी.एस.डब्यूया. प्रथम वर्षाला ०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये माने आकांक्षा (७५.३३ टक्के), येणके वैष्णवी (७३.३३ टक्के), रामपुरे सनिका (६९.६७ टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश असून यामध्ये हासेगाव येथील सेवालयातील दोन विद्यार्थ्यांनीचा समावेश आहे.
    बी.सी.ए. प्रथम वर्षाला ०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
    या सर्व प्रवेशीत गुणवंत विद्यार्थी व पालकांचे श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), संस्थेचे सचिव ॲड माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बस्वराज (राजू) येरटे, संचालक काशिनाथ साखरे, संचालिका ललिता पांढरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक गुरुलिंग धाराशिवे आणि संचालक डॉ महेश हालगे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
    वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेश समितीमध्ये डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. सदाशिव दंदे, डॉ. यशवंत वळवी, डॉ. आनंद शेवाळे, डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. रमेश तडवी, डॉ. मनोहर चपळे, प्रा. धोंडीबा भुरे, डॉ. शितल येरूळे यांचा समावेश असून शिक्षकेतर कर्मचारी म्हणून यशपाल ढोरमारे, संजय सोनवणे, केशव घंटे, रघु शिंदे, महादेव कोरे, जगन्नाथ येंचवाड, राम पाटील, नरेश वाडकर आणि अनिल कोळे हे उत्कृष्ट पद्धतीने कार्य करीत आहेत.
    कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेश समितीमध्ये उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, प्रा. वनिता पाटील, प्रा. नितीन वाणी, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. रविंद्र सोनवणे, प्रा. कल्पना गिराम, डॉ. घनश्याम ताडेवार, प्रा. व्यंकट दुडीले आणि प्रा. दयानंद टेंकाळे यांचा समावेश असून शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नामदेव बेंदरगे, रघु शिंदे, दत्तात्रय पांचाळ, आनंद खोपे आणि राजाभाऊ बोडके हे उत्कृष्ट पद्धतीने कार्य करीत आहेत.
error: Content is protected !!