August 9, 2025

बंडू ताटे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी अभिष्टचिंतन

  • कळंब – ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू आबा ताटे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त शहरातील गणेश चित्र मंदिर रोड येथे दि.५ जून २०२४ रोजी अजित फर्निचर येथे बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी प्रकाशित होत असलेले सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक व अग्रलेख व पथनाट्यांचा संग्रह असलेला”विरंगुळा” हे पुस्तक लेखक व संपादक सुभाष घोडके यांच्या हस्ते देवून,यथोचित सत्कार करून भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
    यावेळी खेर्डा गावचे माजी सरपंच विकास भंडारे,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके,अमित भंडारे आदींची उपस्थिती होती.

  • छत्रपती संभाजी महाराज चौकात दै.लोकमतचे प्रतिनिधी बालाजी आडसुळ व मित्रकंपनी यांनी सत्कार केला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील बालाघाट मल्टिस्टेट बँकेत शाखाव्यवस्थापक विशाल कुंभार व सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितीत,शिवाजी गिड्डे यांच्या निवासस्थानी संदीप कोकाटे,संताजी कोकाटे,मस्सा येथे बजरंग इंगोले, अशोक वरपे व मित्रपरिवार, संत ज्ञानेश्वर निराधार बालकाश्रम पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोणगे,माधवसिंग राजपूत, सरस्वती अडसूळ,सतिश तवले,रमेश शिंदे व विद्यार्थी, ल.सा.क.म व फकीरा दल यांच्या वतीने सहशिक्षक दिलीप मोरे,बाळासाहेब कांबळे,बापू भंडारे यांनी सत्कार करून वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा दिल्या.
error: Content is protected !!