August 9, 2025

महाविद्यालय शैक्षणिक विकासात संस्था पदाधिकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे – सचिव माधवराव पाटील टाकळीकर

  • लातूर – सध्या आपल्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची नियोजन प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासात संस्था पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यासोबत विद्यार्थी आणि पालकांचे सक्रिय योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी होईल असे प्रतिपादन श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले.
    श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वार्षिक नियोजना संबधी संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख आणि कार्यालयीन कर्मचारी यांची विचार विनिमय बैठक प्राचार्य कक्षामध्ये संपन्न झाली. या बैठकीचा अध्यक्षीय समारोप करताना ते मार्गदर्शन करीत होते.
    यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, वरिष्ठ महाविद्यालय कला शाखा समन्वयक डॉ. बाळासाहेब गोडबोले, विज्ञान आणि संगणकशास्त्र शाखा समन्वयक डॉ. सिद्राम डोंगरगे, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. विजयकुमार सोनी, कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखा समन्वयक प्रा. वनिता पाटील, प्रा. नितीन वाणी, कला शाखा समन्वयक प्रा. रवींद्र सोनोने, प्रा. विश्वनाथ स्वामी, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. टि. घनश्याम, प्रा. व्यंकट दुडिले आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ शैक्षणिक वार्षिक नियोजन करणे, शैक्षणिक शुल्क निश्चित शैक्षणिक वार्षिक शुल्क ठरविणे व इतर विविध विकासात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केल्याचे सांगितले.
    पुढे बोलताना माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने आणि देशीकेंद्र महाराज यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, व्होकेशनल, समाजकार्य आणि संगणकशास्त्र या अभ्यासक्रमातून कौशल्ययुक्त विद्यार्थी निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील नवनवीन अभ्यासक्रमाची आपण सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी संस्थेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळेल, असे सांगून सर्व शाखामधील अनुदानित, विनाअनुदानित तुकड्यांची मान्य संख्या ही पूर्ण क्षमतेने आपण सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करावी असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
    यावेळी कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर म्हणाले की, शाखा समन्वयक व विभागप्रमुखांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या विभागाचा शैक्षणिक वार्षिक आराखडा तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे तेव्हाच आपल्याला शैक्षणिक विकास साध्य करता येईल असे ते म्हणाले.
    यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी प्रशासकीय समिती प्रमुख, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
    यावेळी उपस्थित सर्वांनी विविध विषयाची मांडणी करून लवकरच आपापल्या विभागाचे २०२४-२५चे वार्षिक नियोजन प्राचार्याकडे सादर केले जाईल असे सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनी मानले.
    या बैठकीच्या यशस्वीतेसाठी रत्नेश्वर स्वामी, विनायक लोमटे, यशपाल ढोरमारे, महादेव स्वामी, राम पाटील, संतोष येंचेवाड, राजाभाऊ बोडके, संदीप मोरे, श्रीशैल्य पाटील, बालाजी डावकरे यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!