February 9, 2026

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे करोडो लोकांचे आदर्श आहेत – धम्मचारी अनोमदस्सी

  • धाराशिव – पालकांनी आपल्या मुलांसमोर सुसंस्कृत सदाचरणाचा आदर्श ठेवावा त्यातूनच ते उत्तम नागरिक घडतील.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी पित्याने त्यांच्यासमोर उच्च आदर्श ठेवल्यानेच डॉ.बाबासाहेबांना आपण मोठे व्हावे याची प्रेरणा मिळाली व डॉ.बाबासाहेबांनी अतिशय कठोर परिश्रमांनी आपले जीवन घडवले आहे. देश परदेशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे करोडो लोकांचे ते आदर्श बनले आहेत, असे प्रतिपादन उपाध्याय धम्मचारी अनोमदस्सी मुंबई यांनी केले.
    त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटर धाराशिवच्या वतीने म.ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार ज्ञान जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेनिमित्त धाराशिव येथिल व्हिजन करियर अकॅडमीत हा कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी अनोमदस्सी बोलत होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता जे.एस.सावंत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचें प्रोफेसर डॉ. डॉ. दत्तात्रय मुरूमकर,सेंटरचें चेअरमन धम्मचारी रत्नपालित, धम्मचारी ज्ञानपलीत, धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी विबोध आदींची उपस्थिती होती.
    या प्रसंगी जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त उमरगा येथिल विद्यार्थिनी सानिया गुलफरेश हिला सात हजार रुपये रोख ट्रॉफी प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले.द्वितीय आलेल्या नंदिनी सुरवसे हिला पाच हजार रुपये प्रमाणपत्र व तृतीय आलेल्या अंजली कटकधोंड हिला तीन हजार रुपये रोख ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रथम आलेल्या तिघांना अनुक्रमे एक हजार पाचशे, द्वितीय एक हजार व तृतीय स्पर्धकास पाचशे रुपये देऊन गौरविण्यात आले.
    या वेळी डॉ.मुरूमकर म्हणाले की, सध्याचा काळ मोठा कठीण आहे शिकाल तर शिकाल या उक्तीप्रमाणे खूप अभ्यास केला तरच आपले भविष्य उज्वल आहे, त्यामुळे वाचनाची सवय लावावी, निकोप समाज वाढीसाठी मुलांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करावी, स्वप्न मोठे ठेवा आणि स्वतःचे भविष्य उज्वल घडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत रहावे असे ते म्हणाले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मचारी रत्नपालीत यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धमचारी विबोध यांनी केले.
    धम्मचारी ज्ञानपलीत यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मचारी कल्याणदस्सि,प्रज्ञाजीत ,धम्ममित्र भोसले, अशोक सावंत,प्रदीप गायकवाड,अमर कांबळे,काजल गायकवाड, प्रीती मनोहर, तेजस्विनी गायकवाड, हरिदास कांबळे, पंकज गवळी, संगीता सावंत,विनोद कांबळे,ढोणे,तुपारे,अमोल सरवदे,अभिमन्यू गवळी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!